दिवाळी हा आनंदाचा, उत्साहाचा आणि प्रकाशाचा सण आहे. प्रकाश ज्ञानाचा, विकासाचा आणि समृद्धीचा निर्माण होऊन त्यात अज्ञान, अहंकार आणि दारिद्र नाहीस व्हावं. असा प्रयत्न मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाल्यापासून करत आहे. विशेषतः कष्टकरी, शेतकरी यांच्या जीवनात सुखाचे काही क्षण यावेत यासाठी आमचे प्रयत्न आहेत. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेची सुरुवात आम्ही दिवाळीतच करून शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने दिवाळीचा निर्भेळ आनंद घेता यावा, असा प्रयत्न केला आहे. कर्जमाफी हा शेतकऱ्याचा उत्कर्षाचा खरा मार्ग नाही, तर प्रयत्न त्याचा जीवनातील कायमस्वरूपी अस्थिरतेचा अंधार दूर व्हायचा असेल तर शेतीचा शास्वत विकास व्हायला हवा अशी माझी धारणा आहे.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews